हरिवंश राय बच्चन यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त अमिताभ आणि अभिषेक यांनी पोस्ट शेअर करत वाहिली श्रद्धांजली

By  
on  

प्रसिद्ध लेखक हरिवंशराय बच्चन यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त अमिताभ आणि अभिषेक यांनी श्रद्धांजली वाहणारी पोस्ट शेअर केली आहे. बिग बींनी वडिलांचा फोटो शेअर केला आहे. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अमिताभ म्हणतात, ‘ मी महान काव्य लिहू इच्छितो महाकाव्य नाही. पण त्यांनी महान काव्य लिहिलंच नाही तर आत्मकथेच्या रुपात ‘महाकाव्य’ लिहिलं ही आहे.’….. 

 

 

तर अभिषेक आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा आजोबा. हा माझ्या आजोबांचा 113 वा वाढदिवस असेल. मी काम करतो आणि प्रार्थना करतो की मी तुमचा वारसा पुढे नेण्यास सक्षम ठरावा. तुमचे खुप आभार.’ अमिताभ आगामी ’मे डे’ मध्ये दिसणार आहेत तर अभिषेक बॉबी बिस्वास या सिनेमात झळकणार आहे.

 

 

 

 

Recommended

Loading...
Share