प्रभास स्टारर ओम राऊतच्या 'आदिपुरुष'मध्ये क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत?

By  
on  

'तानाजी: द अनसंग वारियर' फेम दिग्दर्शक ओम राऊतच्या आगामी बिग बजेट  'आदिपुरुष'ची सर्वत्र बरीच चर्चा रंगलीय. यात कोणकोणते कलाकार काय व्यक्तिरेखा साकारतायत. याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या सिनेमातून एक महत्त्वाची बातमी समोर येतेय ती म्हणजे प्रभासच्या अपोझीट अभिनेत्रीच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची. ती अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनॉन. क्रिती यात सीतेच्या प्रमुख भूमिकेत दिसेल. प्रभास या सिनेमात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारतोय. तर बॉलिवूड नवाब सैफ अली खान लंकेशच्या म्हणजे रावणाच्या खलनायकी भूमिकेत आहे. 

काही मिडीया रिपोर्टसनुसार, यापूर्वी सीतेच्या प्रमुख भूमिकेसाठी अनुष्का शेट्टी, अनुष्का शर्मा, कियारा अडवाणी, किर्ती सुरेश अशी अनेक नाव चर्चेत होती. पण अखेर क्रितीचं नाव फायनल झाल्याचं सूत्रांकडून कळतंय. हिंदी आणि तेलगू सिनेसृष्टीतील अनेक नावं विचारात घेतल्यानंतर क्रितीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 

 

 

'आदिपुरुष'  हा ओम राऊत स्टाईल जबरदस्त एक्शन- ड्रामा सिनेमा असणार आहे यात शंका नाही. भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. सूत्रांनुसार ह्या सिनेमाचं बजेट हे 350-400 कोटींच्या घरात आहे. पुढच्याच्या पुढच्या वर्षी म्हमजे  ११ ऑगस्ट  २०२२ मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

 

Recommended

Loading...
Share