Video : सारा अली खान आणि वरुण धवनच्या ‘कुली नं. १’चा आला धमाकेदार ट्रेलर

By  
on  

नव्वदच्या दशकात गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आणि चाहत्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची अफलातून  लोकप्रियता पाहाता चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन या सिनेमाचा  रिमेक घेऊन रसिकांसमोर आले आहेत. 

यात डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन गोंविदाने साकारलेली भूमिका वठवतोय तर अभिनेत्री सारा अली खान करिश्मा कपूरने साकारलेली नायिका साकारतेय. या सिनेमाचा बहुप्रतिक्षीत ट्रेलर नुकताच रसिकांच्या भेटीला आला आहे.

 ‘कुली नंबर १’ चित्रपटाचा  धमाकेदार  ट्रेलर प्रदर्शित होताच १ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. ३ मिनिटं १५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये वरुण धवन आणि साराची केमिस्ट्री पाहायला मिळते. दरम्यान चित्रपटात साराच्या वडिलांची भूमिका परेश रावल यांनी साकारली असून त्यांनीसुध्दा लय भारी खळबळ उडवून दिली आहे. 

 

 

 

‘कुली नंबर १’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये सारा आणि वरुणसोबत परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लीवर, राजपाल यादव हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. 

 हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Recommended

Loading...
Share