ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषमध्ये सनी सिंग दिसणार लक्ष्मणच्या भूमिकेत

By  
on  

‘तानाजी:द अनसंग वॉरिअर’ फेम दिग्दर्शक ओम राऊत आता आदिपुरुष या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. रामायणाच्या पौराणिक कथेवर हा सिनेमा बेतला आहे.या सिनेमात प्रभास श्रीरामाची व्यक्तिरेखा साकारताना दिसतो आहे. खुद्द ओम राऊत यांनीच ही बाब स्पष्ट केलं आहे. याशिवाय सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री क्रिती सॅनॉन यात सीतेच्या प्रमुख भूमिकेत दिसेल.

 

 

भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. या सिनेमात श्रीरामांची सावली असलेल्या लक्ष्मणाची भूमिका कोण साकारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.  'प्यार का पंचनामा 2 फेम अभिनेता सनी सिंग या सिनेमात लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे.  2021पासून या सिनेमाचं शुटिंग सुरु होईल. हा सिनेमा हिंदी आणि तेलुगू तमिळ, मल्याळम, कन्नड़ या भाषांमध्येही रिलीज केला जाणार आहे. हा सिनेमा ११ ऑगस्ट  २०२२ मध्ये रिलीज होणार आहे.

Recommended

Loading...
Share