शुटिंग दरम्यान अभिनेता राहूल रॉयला ब्रेन स्ट्रोक, हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

By  
on  

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते राहूल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक झाला आहे. आगामी कारगिल सिनेमासाठी शुटिंग करत असताना हा प्रकार घडला आहे. राहूल यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे. त्यांना ICCU मध्ये ठेवलं गेलं आहे. राहूल या सिनेमात मेजरच्या भूमिकेत आहेत. मेंदूला ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा कमी झाल्याने हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून चाहते त्यांच्या  लवकर बरे होण्याची कामना करत आहेत.

Recommended

Loading...
Share