टीव्ही अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवून दोन वर्ष केला बलात्कार, कास्टिंग डायेक्टर विरोधात गुन्हा दाखल

By  
on  

एका 26 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीवर कथित स्वरुपात बलात्कार केल्याचा एका कास्टिंग डायरेक्टरवर आरोप असून त्याच्याविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. या पीडितेला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं या अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. 

लग्नाचं आमिष दाखवून या कास्टिंग डायरेक्टरने पीडित अभिनेत्रीवर वारंवार बलात्कार केला. लग्नाला नकार दिल्यानंतर या पिडीतेने पोलिस ठाण्यात धाव घेतली.  याप्रकरणी आयुष तिवारीविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. २५ नोव्हेंबर रोजी वर्सोवा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली असून त्याच्यावर कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

या  अभिनेत्रीने काही वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. या वृत्तामुळे मनोरंजनविश्वात एकच खळबळ माजली आहे. 

Recommended

Loading...
Share