धर्मेंद्र यांची बॉबी आणि सनी देओलसोबत अपनेच्या सीक्वेलची घोषणा

By  
on  

ही मॅन धर्मेंद्र यांना पडद्यावर पाहणं त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणी असते. यापुर्वी ‘यमला पगला दीवाना 2’ मध्ये ते अखेरचे दिसले होते. पण आता धर्मेंद्र पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे त्रिकुट पुन्हा एकदा अपने 2 च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 

 

धर्मेंद्र यांनी नुकतीच आपल्या ट्वीटर अकाउंटवर ही बाब शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘ त्यांच्या आशिर्वादासोबतच तुमच्या शुभेच्छांनी आम्ही ‘अपने 2’ द्यायचा निर्णय घेतला आहे. अपने 2007 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एका माझी बॉक्सरच्या जीवनावर ही कथा बेतली होती. अपने 2 चं शुटिंग मार्च किंवा एप्रिल 2021 मध्ये सुरु होईल. लंडन आणि मुंबईमध्ये हा सिनेमा शुट केला जाणार आहे.

Recommended

Loading...
Share