कैलाश खेर यांनी शेअर केल्या ‘त्या’ दिवसांंच्या आठवणी, आली होती आत्महत्येची वेळ

By  
on  

गायक कैलाश खेर यांनी नुकतेच सिनेसृष्टीत 15 वर्षं पुर्ण केली आहेत. या दरम्यान कैलाश यांनी अनेक बाबी शेअर केल्या आहेत. सुरुवातीच्या काळात कैलाश यांना खुप अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळी कैलाश यांच्या इतक्या अडचणी वाढल्या की त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते. 

 

आपल्या प्रवासाबाबत कैलाश म्हणतात, ‘ सुरुवातीला माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नव्हतं. मला खुप रिजेक्शन मिळाले. त्याचीही सवय होत गेली. आता 15 वर्षं झाली आहेत. देवाच्या कृपेने मी संगीत क्षेत्रातील पद्म पुरस्कार मिळवणारा पहिला संगीतकार आहे. मला हा 2017 मध्ये मिळाला.  अनेकदा लोक माझं कौतुक करतात. माझ्या संगीताने ते प्रभावित झाल्याचं सांगतात ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी पावती असते. मी आलो त्यावेळी माझ्याजवळ काही नव्हतं. हे मला सर्वात जास्त प्रभावित करतं. असं कैलाश यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Recommended

Loading...
Share