अजय- अमिताभच्या ‘May Day’ मध्ये अंगिरा धर दिसणार या भूमिकेत

By  
on  

अजय- अमिताभ बच्चनच्या ‘मे डे’साठी चाहते उत्साहित आहेत. अभिनेत्री अंगिरा धर या सिनेमात दिसणार आहे. अंगिरा या सिनेमात वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे. मे डेच्या कास्टला जॉईन करून अंगिरा खुपच खुश आहे. 

‘अमिताभ सर आणि अजय सर यांच्यासोबत काम करून मी खुपच खुश आहे. हा एक धमाकेदार सिनेमा होणार आहे. अंगिरा यापुर्वी ‘कमांडो 3’ मध्ये दिसली होती. मे डे मध्ये मध्ये रकुल प्रीत सिंग पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. रकुल डिसेंबरमध्ये अमिताभ आणि अजयला सेटवर जॉईन करेल. हा सिनेमा वास्तवातील घटनेवर आधारित आहे. हैद्राबादमध्ये या सिनेमाचं शुटिंग एकाच शेड्युलमध्ये संपवण्याचा अजयचा इरादा आहे.

Recommended

Loading...
Share