'अतरंगी रे' च्या सेटवरुन अक्षय कुमार आणि सारा अली खानचा हा गोड फोटो

By  
on  

आनंद एल राय यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा सिनेमा 'अतरंगी रे'ची मध्यंतरी बरीच चर्चा रंगली होती, धनुष,अक्षय कुमार आणि सारा अली खान यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. लॉकडाऊनपूर्वी या सिनेमाचं शूटींग सुरु झालं होतं.

वारणसीत 'अतरंगी रे'चं पहिलं शूटींग शेड्यूल पूर्णत्वास गेलं होतं आणि त्यानंतर लॉकडाऊनच घोषणा झाली होती. आता अनलॉकमध्ये अनेक सिनेमांच्या शूटींगचा पुनश्च श्रीगणेशा सुरु झाला आहे. म्हणूूनच याच दरम्यान आपल्या सिनेमाबाबत प्रेक्षकांना रुची आणि उत्सुकता वाटावी म्हणून साराने अक्षयसोबतचा एक फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

 

Recommended

Loading...
Share