‘तारक मेहता का उलटा चष्मा’ चे लेखक अभिषेक मकवाना यांच्या आत्महत्येबाबत कुटुंबियांनी व्यक्त केला हा संशय

By  
on  

2020 मध्ये धक्कादायक बातम्यांचं सत्र संपताना दिसत नाही. प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ चे लेखक अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली आहे. 27 नोव्हेंबरला अभिषेक यांनी आत्महत्या केली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते आर्थिक अडचणींमधून जात होते.

 

पण त्यांच्या कुटुंबियांच्या मते, अभिषेक ब्लॅकमेल आणि सायबर फसवणूकीची शिकार झाले होते. या संदर्भातीक अनेक फोनही कुटुंबियांना येत असल्याचं समोर येत आहे. अभिषेक यांनी गुजरातीमधून सुसाईड नोट लिहिल्याचं समजतं. या नोटमध्ये परिस्थितीशी लढा दिला पण अखेरीस हार मानत आहे असा आशयाचा मेसेज होता.

Recommended

Loading...
Share