
बॉलिवूडचं सेलिब्रिटी पॉवर कपल म्हणून दीप-वीर प्रसिध्द आहेत. त्यांची लव्हस्टोरी सर्वांनाच आवडते. त्यांच्यातलं प्रेम लग्नानंतरसुध्दा आणखी फुलतंय. आज दीपिकाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात, दीप-वीरची लव्हस्टोरीची सुरुवात.
जशी दीप-वीरची जोडी ऑन स्क्रीन सुपरहिट ठरली तशीच ऑफ स्क्रीनसुध्दा त्यांची जबरदस्त केमिस्ट्री जुळली. एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभेल अशीच आहे ह्यांची लव्हस्टोरी. या दोघांचा तो खास क्षण त्यावेळेस सेटवर उपस्थित असलेला सिनेमातील कोणताच क्रू मेंबर कधीच विसरु शकत नाही.
‘रामलीला’ सिनेमाचा शुटींग सुरु होतं. प्रत्येक क्रू मेंबर आपापल्या कामात बिझी होता. ‘मोहे अंग लगा दे....’ या गाण्याच्या शुटींगची तयारी चालली होती. या गाण्यात रणवीर आणि दीपिका यांच्या किसींगचा एक सीन आहे. हा गुलाबी सीन ठरल्याप्रमाणे सुरु तर झाला पण दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी टेक ओकेसाठी कट म्हटलं तरी स्थळ-काळाचं भान हरपून रणवीर-दीपिका एकमेकांना किस करण्यात अाखंड बुडाले होते. तेव्हाच सर्वांच्या लक्षात आलं दीप-वीरची ही केमिस्ट्री फक्त सिनेमा पुरतीच नाही तर आयुष्यभरासाठी सुरु झालीय.
पण या सिनेमापुरतंच नाही तर ‘बाजीराव-मस्तानी’ सिनेमाच्या सेटवरील क्रू मेंबर्सचंसुध्दा असं म्हणणं आहे की, “दीप-वीर सेटवर अशाप्रकारे एकत्र वावरत होते, खात-पित होते हे पाहूनच समजत होतं की याचं नातं किती घट्ट बनलंय ते.”
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला व ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे बनले.