मणिरत्नमचा सिनेमा ‘गुरु’ ला 14 वर्षं पुर्ण झाल्यानिमित्त ऐश्वर्याने दिला आठवणींना उजाळा

By  
on  

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन स्टारर सिनेमा ‘गुरु’ सिनेमाने नुकतीच 14 वर्षं पुर्ण केली. मणिरत्नमचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा 12 जानेवारी 2007 ला रिलीज झाला होता. या सिनेमाच्या आठवणी ऐश्वर्याने शेअर केल्या आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ऐश्वर्या म्हणते, ‘आजचा दिवस..... 14 वर्षं.... गुरु कायमच’ यासोबतच तिने हार्ट इमोजीही शेअर केली आहे. यावेळी गुरुच्या न्युयॉर्क प्रिमिअरचे फोटो शेअर केले आहेत. 

 

 

या फोटोंमध्ये अभिषेक मुलाखत देतो आहे तर ऐश्वर्या मागे उभी असलेली दिसत आहे. अमिताभ यांनीही या सिनेमासाठी अभिषेकचं कौतुक केलं आहे.

Recommended

Loading...
Share