
अनुपम खेर यांनी नुकताच एक अनुभव शेअर केला आहे. अनुपम यांनी अमिताभ यांना Your best is today’ या पुस्तकाची प्रत भेट म्हणून दिली आहे. अमिताभ यांनी केबीसीच्या सेटवरून ही बाब शेअर केली आहे. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अनुपम म्हणतात, ‘ही माझ्यासाठी सन्मान आणि सौभाग्याचं लक्षण आहे.
मी हे पुस्तक अशा व्यक्तीला गिफ्ट केलं आहे जी अनेकांचं प्रेरणास्थान आहे. त्यांनी याबाबत अर्थातच माझं कौतुक केलं. ते म्हणतात, ‘अरे तुम्ही इतकं सगळं कसं जमवता’. शिकायला हवं.’ यावर मी उत्तर देऊ पाहत होतो की ‘ अमितची माझी मस्करी करत आहात का?’ अनुपम खेर आगामी ‘कश्मीर फाईल्स’ या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.