हे फोटो शेअर करत अभिनेत्री सागरिका घाटगेने दिला वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा

By  
on  

अभिनेत्री सागरिका घाटगेच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं आहे. यावेळी तिने वडिलांसोबतचे अनेक फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सागरिकाचे वडील ज्येष्ठ सिने निर्माते विजयसिंह घाटगे यांचं निधन झालं. ते 64 वर्षांचे होते. विजयसिंह बरेच दिवस किडनीच्या आजाराने ग्रस्त होते.

 

 

सागरिका आपल्या कॅप्शनमध्ये लिहिते, ‘ तुम्ही आमच्यासोबत नाही हा विश्वासच बसत नाही. पण तुम्ही उत्तम ठिकाणी असाल याची खात्री आहे. मी आता अशा पोकळीमध्ये आहे जी कधीही भरून निघणार नाही. तुमची खुप आठवण येते डॅडी.’

Recommended

Loading...
Share