By  
on  

काजोल म्हणते, ‘जेव्हा लॉकडाऊनमध्ये प्रत्येकाला स्पेस हवी असायची त्यावेळी....’

मागील वर्षातील लॉकडाऊनचा काळ प्रत्येकासाठी काहीना काही     वेगळा अनुभव घेऊन आला. अभिनेत्री काजोलनेही या तिचा लॉकडाऊनमधील अनुभव शेअर केला आहे. काजोल म्हणते, लॉकडाऊन कितीही एकत्र असलो तरी प्रत्येकाला स्वत:चा वेळ हवा असतो. लॉकडाऊनमध्ये ही स्पेस मिळवण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य स्वत:च्या खोलीत काही काळ एकटा रहात असे. घरातील चार बेडरुमचा वापर या कामासाठी अनेकदा केला आहे.’ 

ती पुढे म्हणजे, ‘ एक आई म्हणून माझ्यासाठी खास जबाबदा-या होत्या. माझ्या मुलाची शाळा घरीच होती. पण ते नीट अटेंड करेल याची काळजी मला घ्यावी लागली. क्वारंटाईनमध्ये सगळं कुटुंब एकत्र असणं हे खरंच रोमांचक होतं. काजोल आगामी ‘त्रिभंगा’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमाच्या माध्यमातून काजोल तिचा वेब डेब्यु करणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive