By  
on  

लता मंगेशकरांवर टीका करणाऱ्याला अदनान सामीने सुनावले खडे बोल

पाकिस्तानी गायक अदनान सामी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गायक अदनान सामीने सोशल मीडियावर आशा भोसले, लता मंगेशकर आणि नूर जहाँ यांचा फोटो पोस्ट केला होता. एकीकडे सोशल मीडियावर या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत असताना एका युजरने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविरोधात वादग्रस्त कमेंट पोस्ट करत नव्या वादाला तोंड फोडलं. त्या युजरला अदनानने आपल्या शैलीत सडेतोड उत्तर दिलं आहे.

अदनान सामीच्या पोस्टवर त्या संबंधित युजरने लिहिलं, ‘लता मंगेशकर यांचा आवाज खूप चांगला आहे, हे विचार करण्यासाठी भारतीयांचा ब्रेनवॉश केला गेलाय.’ यावर अदनानने उत्तर दिलं, ‘बंदर क्या जाने अदरक का स्वाद (हिंदीतल्या या म्हणीला समानार्थी मराठीतील म्हण- गाढवाला गुळाची चव काय?) 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive