By  
on  

‘आर्मी डे’ चं औचित्य साधत अक्षय कुमारने जवानंसोबत खेळला व्हॉलीबॉल

जैसलमेर (राजस्थान) येथे अक्षय कुमार आगामी ‘बच्चन पांडे’ सिनेमाचं शुटिंग करत आहे. यावेळी त्याने हटके पद्धतीने आर्मी डे साजरा केला आहे. यादिवसाचं औचित्य साधत अक्षय जवानांसोबत व्हॉलीबॉल खेळला. याशिवाय त्याने मॅरॅथॉनचा शुभारंभही केला. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

यावेळी त्याने शेअर केलेल्या व्हिडियोमध्ये तो व्हॉलीबॉल खेळताना दिसतो आहे. अक्षयही जवानांप्रमाणेब्लॅक स्पोर्टस किटमध्ये दिसतो आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अक्षय म्हणतो, ‘आर्मी डे निमित्त काही शूर जवानांना भेटण्याचा आणि मॅराथॉनला फ्लॅगऑफ करण्याची संधी मिळाली. यापेक्षा उत्तम वॉर्मअप काय असू शकतो. अक्षय काही दिवसांपुर्वीच जैसलमेर (राजस्थान) येथे आगामी ‘बच्चन पांडे’ च्या शुटिंगसाठी पोहोचला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive