By  
on  

कंगना नाही तर नीतू चंद्रा होती ‘तनु वेड्स मनु’ची पहिली पसंती, आर माधवनमुळे झाली रिप्लेसमेंट

‘ओए लकी, लकी ओए’ आणि गरम मसला या सिनेमात काम करणारी अभिनेत्रीनीतू चंद्रा हिने धक्कादायक खुलासा केला आहे. आर. माधवनच्या शिफारसीवरून तिला ‘तनु वेड्स मनु’ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं बोललं जात आहे.  याबाबत खुलासा करताना ती म्हणते, ‘‘तनु वेड्स मनु’ साठी मेकर्सची पहिली पसंती ती होती.

 

पण माधवनने सांगितलं की या भूमिकेसाठी दुस-या कोणत्यातरी अभिनेत्रीची निवड झाली आहे. त्यावेळी माधवनने कंगनाची निवड केल्याचं सांगितलं.  माझ्यासोबत हे कितीतरी वेळा झालं आहे. मला एकदम सहा सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. मी बॉलिवूडमध्ये पाय रोवू शकले नाही. पण मला अजूनही बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive