पद्मविभुषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By  
on  

वर्षाच्या सुरुवातीलाच संगीतक्षेत्रासाठी धक्कादायक बातमी आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन झालं आहे. ते 90 वर्षांचे होते. त्यांना पद्म श्री, पद्म भूषण आणि पद्म विभूषण यांनी सन्मानित केलं गेलं होतं. 
सुन नम्रता गुप्ता खान यांनी ही बातमी शेअर केली आहे. 

रामपुर-सहसवान या घराण्याची त्यांची गायकी होती. उस्तादजी आशा भोसले, सोनू निगम, शान, वहीदा रहमान, मन्ना डे, हरिहरन आणि ए आर रहमान यांचे गुरु होते.

 

 

Recommended

Loading...
Share