'तांडव'वर बहिष्कार टाका’, भाजप नेते राम कदम यांचं आवाहन

By  
on  

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान स्टारर ‘तांडव’ ह्या वेबसिरीजवर सध्या टीकेची झोड उठली आहे. या सीरिजमध्ये हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याचं म्हटलं जात असून ही सीरिज बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात होत आहे. बॉयकॉट तांडव हा हॅश टॅग सध्या प्रचंड ट्रेंड होत आहे. वादाच्या भोव-यात सापडलेल्या तांडव वेबसिरीजवर बहिष्कार टाकण्याचंआवाहन भाजपचे नेते राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं  आहे. 

राम कदम ट्विट करत म्हणतात, “चित्रपट किंवा वेब सीरिजच्या माध्यमातून कायम हिंदू देव-देवतांचा अपमान का केला जातो. अलिकडचंच उदाहरण घ्यायचं झालं तर नवीन वेब सीरिज तांडव. सैफ अली खान पुन्हा एकदा अशाच चित्रपट, सीरिजचा भाग झाला आहे, ज्यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सीरिजमधून ते दृश्य हटवले पाहिजेत”, असं ट्विट राम कदम म्हणाले आहेत.

 

 

 

“हिंदू देवता भगवान शंकर. अभिनेता जीशान अय्यूबने जाहीरपणे माफी मागावी आणि जोपर्यंत या सीरिजमध्ये योग्य ते बदल करण्यात येत नाही तोपर्यंत ‘तांडव’वर बहिष्कार टाका”, असं 

Recommended

Loading...
Share