‘तांडव’ भोवतालचा वाद शमण्याची चिन्ह नाहीत, लखनऊमध्ये सिरीजवर गुन्हा दाखल

By  
on  

अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’ वेबसिरीज सध्या वादाच्या भोव-यात सापडली आहे. काही संघटना आणि बीजेपी नेत्यांनी या सिरीजवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. माहिती आणि सुचना प्रसारण मंत्रालयाने यावादावर अमेझॉन प्राईमकडून खुलासा मागितला आहे. या सिरीजविरोधात लखनऊमधील हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आली आहे. 

 

या एफआयआरमध्ये अमेझॉन प्राईम इंडियाचे हेड इंडिया हेड ऑफ ओरिजिनल कंटेंट अपर्णा पुरोहित, अली अब्बास जफर, प्रोड्यूसर हिमांशु कृष्ण मेहरा, लेखक गौरव सोलंकी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याशिवाय माहिती व प्रसारण मंत्रालयानेही या वेब सीरीजसंदर्भात स्पष्टीकरण मागण्यासाठी अ‍ॅमेझॉन प्राइमला नोटीस दिली आहे. याशिवाय सैफ अली खान, मोह्मद जिशान आयुब यांनी हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी माफी मागायला हवी अशी मागणी जोर धरत आहे.

Recommended

Loading...
Share