
ऑगस्ट 2020मध्ये ओम राऊतने आदिपुरुष या सिनेमाची अनाउसमेंट केली. त्याने या सिनेमाच्या व्हिएफक्सच्या कामाला सुरुवात केली आहे. त्याने सोशल मिडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणते, ‘मोशन कॅप्चर सुरु’ 19 जानेवारीपासून आदिपुरुषच्या शुटिंगला सुरुवात करते आहे.
या सिनेमाच्या व्हीएफक्सला आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या तोडीचं बनवलं जाणार आहे. उत्तम प्रॅक्टीस व्हावी यासाठी सुरुवातीला सिनेमाचं शुटिंग बंद सेटवर केलं जाणार आहे. फेब्रुवारीमध्ये मुख्य शुटिंगला सुरुवात होईल. सैफ या सिनेमाला मार्चमध्ये जॉईन करेल. प्रभास आणि सैफ या सिनेमाची तयारी मागील तीन-चार महिन्यांपासून करत आहेत. शुटिंगच्या तयारीचा हा शेवटचा टप्पा आहे. .