पायाच्या शस्त्रक्रियेनंतर कमल हसन यांची प्रकृती स्थिर, लेकींनी मानले चाहत्यांचे आभार

By  
on  

अभिनेता कमल हसन यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. काही वर्षांपुर्वी झालेल्या अ‍ॅक्सिडेंटमुळे त्यांच्या उजव्या पायाच्या हाडावर शस्त्रक्रिया केली गेली. कमल हसन यांची प्रकृती स्थिर आहे. अक्षरा आणि श्रुती हसन यांनी कमल यांच्या प्रकृतीची अपडेट दिली आहे.

 

 

 
याबाबत शेअर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘वडिलांच्या प्रकृतीबाबत प्रत्येकांनी दाखवलेल्या आस्थेबाबत आम्ही आभारी आहोत. आर्थोपेडिक सर्जन डॉ. मोहन कुमार आणि डॉ. जेएसएन मूर्ति यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली आहे. ते आता चार-पाच दिवसात घरी येतील. कमल आगामी ‘विक्रम’च्या प्री-प्रॉडक्शनवर काम करत आहेत.

Recommended

Loading...
Share