ट्वीटर अकाउंट बॅन केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा ओकली गरळ

By  
on  

ट्वीटरवरून वादग्रस्त ट्वीट करण्यासाठी कंगना राणावत प्रसिद्ध आहे. काही दिवसांपुर्वीच तिने सैफ अली खान आणि अली अब्बास जफर यांच्यावर टीका केली होती. ट्वीटरने त्यावेळी तिचं अकाउंट काही काळ बॅन केलं आहे. यावर रिअ‍ॅक्ट करताना ती म्हणते, ‘लिबरल चाचा जॅक डोर्सीसमोर रडले असतील आणि त्यांनी माझं अकाउंट काही काळ बॅन केलं आहे.

 

 

ते मला धमकावत आहेत. माझं अकाउंट, व्हर्च्युअल ओळख देशासाठी कधीही शहीद होऊ शकतं. मी तुमचं आयुष्य कठीण करूनच ऐकेन.’ ‘तांडव’ बाबत चर्चा करताना कंगनाने ट्वीट केलं होतं की, ‘भगवान श्रीकृष्णानेही शिशुपालाचे 99 अपराध पोटात घेतले होते. आधी शांती.... मग क्रांती..... याचं शीर धडावेगळं करण्याची वेळ आली आहे. कंगनाच्या या ट्वीटला अनेकांनी रिपोर्ट केलं होतं. त्यानंतर तिने हे ट्वीट डिलीट केलं होतं.

Recommended

Loading...
Share