‘तांडव’ विवादावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अनिल देशमुख यांनी केलं महत्त्वाचं विधान

By  
on  

सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेली ‘तांडव’ सिरीज सध्या चांगलीच चर्चेत आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी माफी मागूनही आणि विवादीत सीन हटवण्याचं आश्वासन देऊनही अजून वातावरण गरम आहे. उत्तर प्रदेशचे पोलिस महाराष्ट्रात तपासाठी आले आहेत. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्टेटमेंट जारी केलं आहे.

 

 

ते म्हणतात, ‘वेबसिरीज ‘तांडव’बाबत आमच्याकडे तक्रार आली आहे. आम्ही कायदेशीर कारवाई करू. हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला आहे. ओटीटीवरील सिनेमांसाठी आता कायदा करण्याची गरज निर्माण झाली आहे.’ तांडवमध्ये भगवान शंकरवरील असलेल्या सीनला आक्षेप घेतला जात आहे. यावर तो सीन काढून टाकण्याचा निर्णय घेत चाहत्यांची माफीही मागितली आहे.

Recommended

Loading...
Share