या कारणामुळे अक्षय कुमारला सोडून गेली होती त्याची पहिली Girlfriend

By  
on  

अक्षय कुमार पत्नी ट्वींकलसोबत अनेकदा चाहत्यांना कपल गोल्स देत असतो.  पण त्याने नुकताच एक किस्सा शेअर केला आहे. यामध्ये अक्षयने पहिल्यांदाच त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडचा खुलासा केला आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये त्याने हा खुलासा केला आहे. अक्षय त्यावेळी खुपच लाजाळू होता. तिच्याबाबत बोलताना तो म्हणतो, ‘तिचा हात धरावं, किस करू असं तिला सतत वाटायचं. पण मी खुपच लाजाळू असल्याने तसं काही करायचो नाही.

 

मी नकार दिल्यावर ती मला सोडून गेली.’ यावर कपिलने अक्षयला विचारलं की तो यातून काय शिकला. अक्षय म्हणतो की, ‘यानंतर मी एकदम यु टर्न घेतला.’ अक्षयचं यापुर्वी पूजा बत्रा, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, रेखा, आयशा जुल्का अगदी प्रियांका चोप्रा यांच्यासोबतही नाव जोडलं गेलं आहे.

Recommended

Loading...
Share