By  
on  

ऐन उमेदीत त्याने घेतला आयुष्य संपवण्याचा निर्णय..सुशांतच्या आठवणीत चाहते भावूक

त्याचं जाणं अवघ्या सिनेसृष्टीलाच नाही तर संपूर्ण देशवासियांना चटका लावून गेलं. मेकॅनिकल इंजिनीअर, बॅकग्राऊण्ड डान्सर, छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय नायक ते .....बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता अशी ओळख प्रस्थापित करणा-या सुशांत सिंग राजपूतचं आत्महत्या करणं अनपेक्षित होतं....ऐन उमेदीच्या काळात त्याने ही एक्झीट स्वत:हून निवडली आणि अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवले. 

21 जानेवारी...2021 आज सुशांत सिंह राजपूतचा जन्मदिन. सुशांत आज 35 वर्षांचा झाला असता... पण, सुशांत आपल्यासोबत नाही. यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना सुशांतने जगाचा निरोप घेतला. आता कुटुंबिय, निकटवर्तिय आणि चाहत्यांकडे फक्त त्याच्या आठवणीच उरल्या आहेत. 

14 जून 2020 ला सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं होतं.

आत्महत्या? का? कशासाठी? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. सुशांतचे कुटुंबीय, मीडिया आणि फॅन्स त्याच्या मृत्यूची कारणं शोधू लागले. सुशांतचा मृत्यू सर्वांसाठी  एक मोठा धक्का होता. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive