By  
on  

सोनू सुदला मुंबई हायकोर्टाकडून झटका, BMC विरोधातील याचिका फेटाळली

बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी सोनू सुदला मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे. हायकोर्टाने सोनूची अपील आणि अंतरिम याचिका रद्द केली आहे. त्यामुळे आता सोनूवर बीएमसी कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोनूने डिसेंबर 2020मध्ये बीएमसीच्या नोटिशीविरोधात अपील केलं होतं. पण न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. 

 

काही दिवसांपुर्वी सोनू सुदला बीएमसीने एका रहिवासी कॉम्प्लेक्स संदर्भात नोटीस पाठवली होती. जुहु येथील रहिवाशी इमारतीमध्ये कोणत्याही परवानगी शिवाय हॉटेल सुरु केल्याचं बीएमसीचं म्हणणं होतं. तर सोनूने हा दावा फेटाळला होता. सोनूचे वकिल म्हणतात, ‘ग्राउंड फ्लोअरवर आधीपासूनच रेस्टॉरंट आहे. याचं लायसन्सही आधीपासून आमच्याकडे आहे. तर इमारतीसाठी फायर डिपार्टमेंटचं अप्रुवलही आहे. याशिवाय कोविड काळात या इमारतीचा उपयोग पोलिसांना राहण्यासाठीही केला गेला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive