By  
on  

सुशांत सिंग राजपुतच्या बहिणीने त्याच्या जयंतीनिमित्त अ‍ॅस्ट्रोफिजिक्स विद्यार्थांना जाहीर केली

गुणी अभिनेता सुशांत सिंह राजपुतची आज 35 वी जयंती आहे. त्याच्या अकाली जाण्याने अनेकांना धक्का बसला. सुशांतच्या जाण्यानंतर आठवणींच्या माध्यमातून तो आपल्यात आहे, असा विश्वास चाहते सतत निर्माण करत आहेत. सतत हसमुख असलेल्या हा कलाकार नैराश्यात होता हे सांगूनही पटत नाही. बॉलिवूडचा  एक हरहुन्नरी कलाकार म्हणून सुशांत सिंह राजपूत ओळखला जायचा. बॉलिवूडमध्येही त्याने आपलं स्थान निर्माण केलं. 

 

 

आज त्याची 35 वी जयंती आहे. याचं औचित्य साधत त्याची बहीण श्वेता सिंह किर्तीने अ‍ॅस्ट्रोफिजिक्स विद्यार्थांना 35,000 डॉलरची शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. श्वेताने सोशल मिडियाच्या माध्यमातून ही बाब शेअर केली होती. ‘लव्ह यु भाई. तू कायमच माझा एक हिस्सा असशील.’ एम.एस.धोनी, केदारनाथ, छिछोरे या सिनेमातून सुशांतने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं.  14 जुन 2020 या दिवशी मुंबईतील वांद्रे येथे राहत्या घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाची माहिती समजल्यानंतर चाहते आणि कलाविश्व  शोकसागरात बुडालं.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive