By  
on  

नताशासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी वरुण झाला अलिबागला रवाना, असा आहे Wedding plan आणि Venue

हॅण्डसम हंक वरुण धवनच्या लग्नाचे आाता सर्वांना वेध लागले आहेत. वरुण गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत अलिबागमधील ‘The Mansion House’ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.  वरुण आणि नताशा 24 जानेवारीला लग्नबंधनात अडकतील. 

नुकतेच नताशा आणि वरुण अलीबागसाठी रवाना झाले आहेत. वरुण आणि नताशा लग्न करत असलेलं हॉटेल पुर्ण पांढ-या रंगाने रंगवलं आहे. या मॅन्शनमध्ये जवळपास 25 खोल्या आहेत. या खोल्यांच्या एका रात्रीचं भाडं जवळपास 4 लाख रुपये आहे. सासावने समुद्र  किना-यापासून हे मॅन्शन अगदी काही अंतरावर आहे. 

या मॅन्शनमध्ये तीन प्रकारच्या रुम आहेत. स्काय डेक, कोव रूम्स आणि पाम कोर्ट रुम आहे. नवरी नताशाने तिचा लेहंगा स्वत: डिझाईन केला आहे. कुणाल रावलने वरुणचा ड्रेस डिझाईन केला आहे. वरुण-नताशाचं लग्न पाच दिवसांचा सोहळा असणार आहे. 22 जानेवारीपासून या लग्नाचे विधी सुरु होतील. 26 तारखेला बॉलिवूडसाठी रिसेप्शन असणार आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive