भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं निधन, दोन महिन्यांपासून सुरु होते उपचार

By  
on  

प्रसिद्ध भजन सम्राट नरेंद्र चांचल यांचं आज दीर्घआजाराने निधन झालं आहे. नरेंद्र हे 80 वर्षांचे होते. दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वृद्धापकाळाने त्यांना अशक्तपणा आला होता. त्यांच्यावर मागील दोन महिन्यांपासून उपचार सुरु होते. 

"चलो बुलावा आया है.." त्याचं लोकप्रीय गाणं ठरलं होतं. त्यांच्या निधनानं संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध गायक दलेर मेहेंदी यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दलेर यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून ही श्रध्दांजली वाहिली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नरेंद्र यांच्या निधनानं शोक व्यक्त करत सोशल मिडीयावर श्रद्धांजली वाहिली आहे.

नरेंद्र चंचंल यांनी बॉलिवुडमध्येही काही गाणी गायली होती. त्यांनी गायलेली गाणी हीट ठरली होती.  बॉबी, बेनाम, रोटी कपडा और मकान या सिनेमांसाठी त्यांनी गाणी गायली होती. 

Recommended

Loading...
Share