दमदार लुकसह अक्षय कुमारने जाहीर केली 'बच्चन पांडे'ची रिलीज डेट

By  
on  

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या बच्चन पांडे सिनेमाबाबत बरीच उत्सुकता असताना या सिनेमातला एक दमदार लुक अक्षयने नुकताच चाहत्यांशी शेअर केला आहे. अक्षय आपल्या सोशल मिडीयावर हा जबरदस्त फोटो शेअर करत म्हणतो, 'याचा एक लुकच सर्वकाही सांगतोय.' या सोबतच अक्षयने या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेवरुन पडदासुध्दा उलडला आहे. पुढच्यावर्षी प्रजासत्ताकदिनी अक्षयचा बच्चन पांडे प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 26 जानेवारी 2022 ही या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आहे. 

लॉकडाऊनमध्ये अक्षय कुमार आणि कृती सनॉनच्या बच्चन पांडेचं शुटिंग पुढे ढकललं होतं. या सिनेमाच्या शुटिंगला आता सुरुवात झाली आहे. 6 जानेवरीपासून जैसलमेरमध्ये या सिनेमाचं शुटिंग सुरु होतं. कृति, अरशद वारसी, प्रतीक बब्बर, सहर्ष कुमार शुक्ला यांच्यासह संपूर्ण टीम जैसलमेरला शूटींगसाठी रवाना झाली होती.

 

 

 

बच्चन पांडे या धम्माल  कॉमेडी सिनेमात अक्षय एका गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसेल जिथे त्याला हिरो बनायची इच्छा असते. तर कृती एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसेल जिला दिग्दर्शक व्हायचं असतं.   

Recommended

Loading...
Share