लग्नानंतर लगेचच हनिमूनसाठी तुर्कीला रवाना होणार वरुण आणि नताशा?

By  
on  

आज 24 जानेवरीला वरुण धवन आणि नताशा दलाल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. कालपर्यंत सगळे नातेवाईक नवरा-नवरी सहित अलिबागला पोहोचले आहेत. अत्यंत मोजक्या नातेवाईकांमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. वरुण गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत अलिबागमधील ‘The Mansion House’ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सासावने समुद्र किना-यापासून हे मॅन्शन अगदी काही अंतरावर आहे.

 

यानंतर ही जोडी हनिमूनसाठी तुर्कीमधील इस्तांबूल या शहरात जाणार आहे. ही जोडी जगातील सर्वात महागड्या हॉटेल्सपैकी एक असलेल्या सिरागन पॅलेस केम्पिंस्की हॉटेलमध्ये ही जोडी राहेल.  या लग्नाला सलमान खान, सारा अली खान, करण जोहर, मनीष मल्होत्रा, अर्जुन कपूर-मलाइका अरोरा, जान्हवी कपूर-ख़ुशी कपूर, जॅकी भगनानी, कतरीना कैफ, नीतू कपूर, कियारा आडवाणी, अनिल कपूर, रिया कपूर, हर्ष वर्धन कपूर हे सेलिब्रिटी हजर राहणार आहेत.

Recommended

Loading...
Share