By  
on  

कपिल शर्मा शोच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, शो होणार बंद?

टेलिव्हिजन विश्वात ‘द कपिल शर्मा’ शोचा एक वेगळाच दबदबा आहे. या शोचे फॅन फक्त देशातच नाही तर जगभरात विखुरले आहेत. प्रत्येक आठवड्याला कपिल वेगवेगळ्या स्कीटमधून कपिल चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. दोन वर्षांहून अधिक काळ हा शो चाहत्यांचं मनोरंजन करतो आहे. 

 

पण या शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. हा शो आता काही काळासाठी ऑफ एअर होणार असल्याचं समजत आहे. यासोबत एका नव्या सीझनसोबत हा शो समोर येणार असल्याचं बोललं जात आहे. 2016 मध्ये हा शो सुरु झाला होता. 2017 मध्ये ऑफ एअर झाला. कपिल आणि सुनील याच्या भांडणाने या शोला निरोप घेण्यास भाग पाडलं. हा शो 2018 मध्ये पुन्हा सुरु झाला.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive