पाहा Video : धकधक गर्ल माधुरी दीक्षितने चाहत्यांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

By  
on  

आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सगळीकडे देशभक्तिचं वातावरण आहे. यातच सोशल मिडीयावर अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. तिरंग्यासोबतचे फोटो, देशभक्तिपर कविता, गाणी, गाण्यांवर नृत्याचा व्हिडीओ असं बरचं काही पाहायला मिळतय. सोशल मिडीयावरही मोठ्या प्रमाणात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. 

धकधक गर्ल म्हणून ओळख असलेली सौंदर्यवती, उत्तम नृत्यांगना असलेली सुपरस्टार माधुरी दीक्षितनेही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माधुरीने एक खास व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. आणि भारतवासियांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना माधुरी तिरंगा ही आपली ओळख असल्याचं या व्हिडीओत सांगतेय.

 

माधुरी ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. शिवाय विविध उत्सव, सणालाही आवर्जुन चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसते.

Recommended

Loading...
Share