By  
on  

मधुर भांडारकरच्या 'इंडिया लॉकडाउन'च्या तयारीसाठी ही अभिनेत्री पोहोचली रेड लाईट भागात

 प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा आगामी सिनेमा 'इंडिया लॉकडाउन' च्या तयारीला आता सुरुवात झाली आहे. नुकतच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. 2020 मध्ये कोरोनाग्रस्त परिस्थितीत झालेलं लॉकडाउन आणि या दरम्यान समाजातील बऱ्याच घटकांना भेडसावणाऱ्या अडचणी याविषयी हा सिनेमा आधारित आहे. या लॉकडाउनदरम्यान समाजातील अनेक घटकांना ज्या अडचणींना सामोर जावं लागलं, त्याचे भारतीयांवर झालेले परिणाम यावर हा सिनेमा भाष्य करताना दिसेल. या लॉकडाउन दरम्यान मुंबईच्या रेड लाईट भागातील सेक्स वर्कर्सना काय अडचणींना सामोरं जावं लागलं आणि त्यांच्यावर काय परिणाम झाला हेही यात दाखवण्यात येईल. 

 या सिनेमात अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद सेक्स वर्कर मेहरुनिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. आणि याच भूमिकेच्या तयारीसाठी श्वेताने मुंबईतील रेड लाईट भागाला भेट दिली. मुंबईतील कामाठीपुरा या ठिकाणी ती गेली होती.  याविषयी ती सांगते की, "मी जी भूमिका साकारतेय ती खरी आहे आणि त्यात मला मुरायचं आहे. जर मी तसं नाही केल तर प्रेक्षक त्यासोबत जोडला जाणार नाही. मी मेहरुनिसा या सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे. दोन आठवड्यापूर्वी मी आणि मधुर सर आमच्या टीमसोबत कामाठीपुरा येथे गेलो, जिथे आम्ही सहा सेक्स वर्कर्सना भेटलो. सरांना जाणवलं की माझी भाषा खूप जास्त पॉलिश आहे या भूमिकेसाठी. तर युक्ती ही होती की या भूमिकेसाठी मी कशी माझी भाषा बदलते. ते कसे विचार करतात हे कळण्यासाठी मी त्या बायकांना भेटावं अशी त्यांची इच्छा होती.  कशाप्रकारे लॉकडाउनमुळे त्यांच्या उद्योगावर परिणाम झाला याविषयीची कहाणी त्यांच्याकडे होती. त्यांच्या घरताली परिस्थिती, राहणीमान आणि घर यात शिरण्याचा हा एक आयुष्यभराचा अनुभव होता. ज्याने मला बॅकस्टोरी लिहीण्यात मदत झाली."

श्वेताने हे नाकरले की ती या भेटीत  घाबरली होती. ती एक पत्रकारिता शिकलेली विद्यार्थी असून तिने काही डॉक्यूमेंटरीही बनवल्या असल्याचं ती सांगते. फक्त त्या ठिकाणी जाऊन अयोग्य प्रश्न विचारून मी त्यांना अस्वस्थ करेल याची भिती असल्याचं ती सांगते. तिथे श्वेता मेहरुनिसाला भेटल्याचही सांगते.


 
श्वेताने नुकतच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. ती पुढे सांगते की, "माझ्या सोबत मधुर सर असताना, मला खात्री आहे की आम्ही यातून प्रवास करू. मी 'चांदनी बार' मधील तबू, 'चमेली' मधील करिना कपूर, 'ट्राफिक सिग्नल' मधील कोनकोना सेनशर्मा, 'मंडी' मधील स्मिता पाटील आणि शबाना आझमी पाहिल्या आहेत. आणि आता  सेस्क वर्करची ही ह्दयस्पर्शी सुंदर कहाणी मोठ्या स्क्रिनवर साकारण्याची माझी पाळी आहे."

Recommended

PeepingMoon Exclusive