By  
on  

राजीव यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच बेशुद्ध पडले रणधीर कपूर, वाचा सविस्तर

अभिनेता, दिग्दर्शक राजीव कपूर यांचं नुकतंच निधन झालं आहे. ते 58 वर्षांचे होते. राजीव यांचं कार्डियाक अरेस्टने निधन झालं आहे. यावेळी रणधीर त्यांच्यासोबत होते. नीतू कपूर यांनी त्यांच्या निधनाची बातमी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली. 
राजीव यांच्या आकस्मिक जाण्याने घरच्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

 

पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार राजीव यांच्या मृत्यूची बातमी कळताच रणधीर कपूर बेशुद्ध झाले होते. अर्धा तास त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं गेलं होतं. ‘मी मोठा आहे. पण तरीही तो माझ्याआधी गेला.’ या शब्दात त्यांनी दु:खाला वाट करून दिली. मागील वर्षी ऋषी यांचं निधन झालं आहे. वर्षाखेरीस घरातील दुस-या सदस्याचं निधन झाल्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive