By  
on  

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी राहुल वैद्यला मिळणार खास सरप्राईज, बिग बॉसच्या घरात येणार गर्लफ्रेंड दिशा ?

कायम चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात राहणारा रिएलिटी शो बिग बॉस या पर्वातही चर्चेत आहे. बिग बॉसचं हे 14 पर्व सुरु आहे जे आता लवकरच संपणार असून या सिझनचा विजेता किंवा विजेती घोषीत करण्यात येईल. या सिझनमधील स्पर्धक राहुल वैद्यही त्याच्या हटके खेळामुळे चर्चेत राहिलाय. शिवाय त्याने बिग बॉसच्या घराच्या आतुन त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं होतं. आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने राहुलला बिग बॉसच्या घरात खास सरप्राईज मिळणार असल्याचं बोललं जातय. 

सुरुवातीला असं बोललं गेलं की बिग बॉसच्या मेकर्सनी दिशाला बिग बॉसमध्ये येण्यासाठी विचारणा केली होती मात्र तेव्हा तिन नकार दिला होता. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार आता दिशा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी राहुलला सरप्राईज देण्यासाठी बिग बॉसच्या घरात जाणार असल्याचं बोललं जातय. 

एका प्रसिद्ध वेबसाईटच्या माहितीनुसार राहुल त्याचा व्हॅलेंटाईन डे बिग बॉसच्या घरात दिशासोबत साजरा करणार आहे. बिग बॉसच्या घरात दिशाचे हजेर कधी लागले याची राहुलला सुरुवातीपासूनच उत्सुकता होती, मात्र तसं झालं नाही. मात्र दिशाचं हे सरप्राईज राहुलला नक्की आनंद देईल एवढं नक्की. 

राहुलची आई गीता वैद्य यांनी केलेल्या खुलास्यानुसार राहुल यावर्षी जून महिन्यात दिशासोबत लग्न करणार असल्याचं बोललं गेलं. गीता म्हटल्या होत्या की, "आम्ही जून महिन्यात त्याच्या लग्नाची तयारी करतोय. आम्ही अजून तारीख ठरवलेली नाही. कारण राहुल बिग बॉसच्या घराबाहेर येऊन याविषयी ठरवेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive