करिनाच्या घरातील छोटा पाहुणा या सदस्यासारखा दिसतो, रणधीर कपूर यांनी केलं शेअर

By  
on  

करिनाने दुस-या प्रेग्नंसीची बातमी शेअर केल्यानंतर तैमुरला भाऊ मिळणार की बहिण याची उत्सुकता होती. 21 फेब्रुवारी म्हणजे आजच करिनाने बाळाला जन्म दिला आहे. करिना डिलीव्हरीसाठी काल ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. 
तैमुरला भाऊ झाल्याची बातमी कळताच करिना आणि सैफवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. करिनाचा या बाळाचा चेहरा मोहरा कसा आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. 

 

बाळाचे आजोबा म्हणजेच रणधीर कपूर यांनी मात्र बाळ तैमुरसारखं दिसत असल्याचं सांगितलं आहे. ‘खरं तर मला सगळी बाळं एकसारखीच दिसतात. पण तिथे अनेक लोक म्हणत होते की बाळ तैमुरसारखं दिसत आहे.’ सैफ सध्या करिनासोबत पॅटिनर्टी लीव्हवर आहे.

Recommended

Loading...
Share