पाहा Video : एयरपोर्टवर फोटो क्लिक करणाऱ्यांवर चिडला कपिल शर्मा, म्हटला "उल्लू के पट्ठे"

By  
on  

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा हा त्याच्या जबरदस्त कॉमेडी टायमिंगसोबत त्याच्या रागामुळेही चर्चेत असतो. आणि नुकतीच याची पुन्हा एकदा प्रचिती आली. कपिल शर्माला नुकतच एयरपोर्टवर स्पॉट करण्यात आल. यावेळी कपिल शर्मा व्हिल चेयरपवर दिसला. कपिलला व्हिल चेयरवरुन घेऊन जात असताना तिथे उपस्थित फोटोग्राफर्स पपाराझींनी फोटो क्लिक करायाला सुरुवात केली. मात्र कपिल त्यांच्यावर चिडला आणि तिथू निघून जायला सांगीतलं. एवढच नाही तर कपिल त्यांच्यावर चिडून त्यांनान "उल्लू के पट्ठे" असं म्हटला. 

यावेळी व्हिल चेयरवरून घेऊन जात असताना कपिल रागात दिसला. कपिलने फोटोसाठी नकार दिल्यानंतरही फोटोग्राफर्स फोटो क्लिक करत होते. मात्र शेवटी कपिलने रागात  "उल्लू के पट्ठे" असं म्हटला. 

 

कपिल एयरपोर्टवर व्हिल चेयरवर का होता याचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. यावेळी शूट करण्यात आलेला व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ज्यात कपिल रागात असल्याचं पाहायला मिळतय. 

Recommended

Loading...
Share