By  
on  

सुसाईडची फेक न्यूज ऐकून भडकला अध्ययन सुमन, वडिल शेखर सुमन चॅनेल विरोधात घेणार लीगल एक्शन

एकीकडे एकामागोमाग एक आत्महत्येच्या बातम्या येत असताना शेखर सुमनचा मुलगा अध्ययनच्या सुसाइडच्या फेक बातमीनेही सगळ्यांना धक्का बसला. एका न्यूज चॅनेलने अध्ययनने आत्महत्या केली असल्याची फेक न्यूज दिली. यानंतर शेखर सुमनच्या फॅमिलीला मोठा धक्का बसला. नुकतच शेखर सुमन यांनी ट्विट करून याविषयीचा खुलासा केला आहे. अशाप्रकारची बातमी दाखवणं बेजबाबदारी वक्तव्य आहे. शेकर आता या चॅनेल विरोधात कारवाई करणाच्या तयारीत आहे. याशिवाय स्वत: अध्ययननेही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.

 

अध्ययनने पापराझीसोबत बोलताना सांगीतलं की, "जर मी सुसाईड केल आहे तर हे काय माझं भूत उभं आहे का ? हे खूपच लज्जास्पद आहे. मी एका मिटींगमध्ये होतो जेव्हा लोकांनी मला फोन करायला सुरुवात केली. अनेकांना भिती वाटली कारण मी फोनही उचलत नव्हतो. जेव्हा माझ्या आईने मला फोन केला तेव्हा  माझी आईसुद्धा घाबरली होती."

 

 

तर शेखर सुमन यांनी या न्यूज रिपोर्टचा व्हिडीओही ट्विटरवर शेयर केला आहे. ज्यात त्यांचा मुलगा अध्ययन सुमनने आत्महत्या केली असल्याची चुकीची बातमी आहे. शेखर सांगतात की तेव्हा त्यांचा मुलगा दिल्लीत होता आणि त्याचा फोनही लागत नव्हता.  ही बातमी बघीतल्यानंतर त्यांची पत्नी आणि परिवार धक्क्यात होते. अध्ययन दिल्लीत असल्यामुळे त्याच्याशी संपर्कही होऊ शकत नव्हता. अशा प्रकारची फेक न्यूज दाखवण्यासाठी शेखर यांनी चॅनेलकडून माफीची मागणी केली आहे. शिवाय लिगल एक्शन घेणार असल्याचही पोस्टमध्ये म्हटलय.

Recommended

PeepingMoon Exclusive