अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मीचा मिस्ट्री थ्रिलर ‘चेहरे’ ची रिलीज डेट आली समोर

By  
on  

मागील वर्षी करोनाच्या विळख्यात सापडलेली सिनेसृष्टी आता कुठे स्थिरावत आहे. आता एका मागोमाग एक सिनेमाच्या रिलीजची घोषणा होते आहे. या यादीत अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मीचा मिस्ट्री थ्रिलर ‘चेहरे’चाही समावेश झाला आहे. ‘चेहरे’ 30 एप्रिल 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 

 

अमिताभ यांनी या सिनेमाचं पोस्टर शेअर करत माहिती दिली आहे. या पोस्टरमध्ये इम्रान आणि अमिताभ यांच्यासह अनु मलिक, क्रिस्टल डिसूजा, रघुवीर यादव, सिद्धांत कपूर हे कलाकार दिसत आहेत. हा सिनेमा 2020मध्ये 24 एप्रिलला रिलीज होणार होता. पण करोनाच्या उद्रेकाने याचं प्रदर्शन लांबणीवर पडलं. आनंद पंडित आणि सरस्वती एंटरटेनमेंट यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Recommended

Loading...
Share