‘माझ्या आईसाठी कृपया प्रार्थना करा’, राखीची चाहत्यांना कळकळीची विनंती

By  
on  

यंदा ‘बिग बॉस १४’मध्ये अभिनेत्री राखी सावंतने हजेरी लावली आणि शोला तडका लावला. राखीने बिग बॉसच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये स्थान पटकावले होते. त्यानंतर तिने १४ लाख रुपये घेऊन फिनालेमधून बाहेर सोडण्याचा निर्णय घेतला. हे मिळालेले पैसे आईच्या उपचारासाठी वापरणार असल्याचे राखीने फिनालेमध्ये स्पष्ट केलं.

बिग बॉस १४च्या फिनालेमध्ये राखी सावंतचा भाऊ राकेशने हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने आई ICUमध्ये असल्याचे सांगितले होते. आता राखीने सोशल मीडियावर आईचा फोटो शेअर करत माझ्या आईसाठी प्रार्थना करा असे म्हटले आहे.

 

 

 

राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईचे दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, ‘माझ्या आईसाठी प्रार्थना करा. ती कॅन्सरवर उपचार घेत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हा फोटो पाहून चाहते भावूक झाले आहेत. 

Recommended

Loading...
Share