'गंगूबाई काठियावाडीचं' नवं पोस्टर रिलीज , समोर आला आलियाचा हटके अंदाज

By  
on  

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी बहुप्रतिक्षित सिनेमा गंगूबाई काठियावाडी च्या रिलीजची तारीख समोर आली आहे. यासोबतच सिनेमाचं नवीन पोस्टरही समोर आलं आहे. या पोस्टरमधून आलियाचा हटके अंदाज दिसतो आहे. 30 जुलै 2021ला हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे.

 

 

हुसेन जैदी यांच्या 'माफीया क्वीन्स ऑफ मुंबई' तीला एका प्रकरणामध्ये गंगुबाई कोठेवालीचा उल्लेख आहे. 'गंगुबाई' ही मुंबईतील रेड लाईट एरिया कामाठीपुरामध्ये 'मॅडम' म्हणुन ओळखली जायची. आपल्या पोस्टरमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. कुख्यात गँगस्टर सुद्धा गंगुबाईच्या संपर्कात होते. या सिनेमामुळे आलियाच्या खात्यात पुन्हा एकदा हटके भूमिका असल्याचं समोर येत आहे.

Recommended

Loading...
Share