आईच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी शेअर करत जान्हवीने दिला श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा

By  
on  

तीन वर्षापुर्वी श्रीदेवीच्या निधनाने सगळा देश शोकसागरात बुडाला. दुबईमध्ये श्रीदेवीने अखेरचा श्वास घेतला. एका लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या श्रीदेवीचा तिथे दुर्दैवी मृत्यू झाला. श्रीदेवी तिच्या मृत्युला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. श्रीदेवीची लेक अभिनेत्री जान्हवी कपूरनेही आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक चिठ्ठी आणि त्यावर लिहिलेला मजकूर दिसतो आहे. 

 

 

“I love you my labbu. You are the best baby in the world” असं त्या चिठ्ठीवर लिहिलं आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने “मिस यू” हे कॅप्शनही दिलं आहे. ही चिट्ठी श्रीदेवीच्या हस्ताक्षरातील असावी असा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त होतो आहे. जान्हवी आता राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांच्या सोबत ‘रुही’ या सिनेमात दिसणार आहे.

Recommended

Loading...
Share