अ‍ॅक्शनचा हाय व्होल्टेज ड्रामा दिसतोय जॉन अब्राहमच्या मुंबई सागाच्या टीजरमध्ये

By  
on  

जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांचा गॅंगस्टर ड्रामा ‘मुंबई सागा’ चा टीजर प्रेक्षकांच्या समोर आला आहे. 19 मार्च 2021 ला मुंबई सागा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. जॉन अब्राहम या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये तुफान अ‍ॅक्शन दिसते आहे. जेव्हा बॉम्बे मुंबई नव्हती आणि रस्त्यांवर हिंसेचं राज्य़ होतं! हे कॅप्शन देत जॉनने सिनेमाचा टीजर रिलीज केला आहे.

 

 

या सिनेमात जॉन पुन्हा एकदा एका गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर इमरान हाश्मी पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळेल. सिनेमात गुलशन ग्रोवर, रोहित रॉय, समीर सोनी, अमोल गुप्ते, प्रतीक बब्बर आणि काजल अग्रवाल हे कलाकार आहेत.  भूषण कुमार, कृष्ण कुमार, संगीता अहीर आणि अनुराधा गुप्ता हे या सिनेमाचे निर्माते आहेत.

Recommended

Loading...
Share