प्रसिद्ध गायक सरदुल सिकंदर काळाच्या पडद्याआड

By  
on  

प्रसिद्ध पंजाबी गायक सरदुल सिकंदर यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांना किडनीचा संसर्ग झाला होता. यातच त्यांना करोनाचा संसर्ग झाला.  बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरदूल यांनी पंजाबी सिनेसृष्टीमधील अनेक हिट गाणी गायली होती.

 

 

सरदुल यांना पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, कपिल शर्मा, दलेर मेहंदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 'हुस्ना दे मल्को'  या अल्बमने त्यांना जगभरात ओळख मिळवून दिली होती. 'जग्गा डाकू' या सिनेमात अभिनयही केला होता.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share