By  
on  

संजय लीला भंसाळींच्या बर्थडे पार्टीला आलियाची 'गंगूबाई काठियावाडी' स्टाईल

नुक संजय लीला भंसाली यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी या सेलिब्रेशनसाठी अनेकांनी हजेरी लावली होती. मात्र यंदा त्यांचा वाढदिवस हा एक्स्ट्रा स्पेशल ठरला. कारण या वाढदिवसाला त्यांचा सिनेमा 'गंगूबाई काठियावाड़ी' चा टीजर प्रदर्शित करण्यात आला. आलिया भट्ट स्टारर हा सिनेमा येत्या 30 जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

या टीजरला चांगल्या प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत. सोशल मिडीयावरही हा टीजर चर्चेत आहे. असं बोललं जायत की भंसाळी यांच्या मागील काही सिनेमांप्रमाणे हा सिनेमा देखली सुपरहीट मानला जाईल. टीजर रिलीजनंतर भंसाळी यांनी खास पार्टी आयोजीत केली होती. 

या पार्टीला आलिया भट्टची खास हजेरी पाहायला मिळाली. पांढऱ्या रंगाच्या जम्पसूट आउटफिटमध्ये आलिया यावेळी सुंदर दिसत होती. यावेळी फोटोग्राफर्सना पोझ देण्यासाठी आलिया भंसाळी यांच्या बालकनीमध्ये उभी राहिली. तिथूनच आलियाने फोटोसाठी पोझ दिल्या. यावेळी आलियाने 'गंगूबाई' स्टाइलमध्ये नमस्कारही केला. आलियाचा हटके अंदाज यावेळी पाहायला मिळाला. 

Recommended

PeepingMoon Exclusive