By  
on  

फॅनचं प्रेम दीपिका पदुकोणला पडलं भारी, गर्दीत खेचली पर्स

फॅन्सच्या अतीप्रेमाचा अनेकदा कलाकारांना मनस्ताप सहन करावा लागतो. आवडत्या कलाकाराला पाहताच अनेकदा चाहते अतिउत्साही होतात. त्यामुळे वाईट प्रसंगही घडतात. एका हॉटेलमधून बाहेर पडत असलेल्या दीपिकाला पाहताच मोठी गर्दी झाली. बॉडीगार्डच्या मदतीने दीपिका गर्दीतून वाट काढत होती. मात्र यावेळी चाहत्यांसोबतच काही टिश्यू पेपर विकणाऱ्या महिला दीपिकासमोर आल्या. 

 

 

या सगळ्यातून वाट काढत ती कशीबशी गाडीपर्यंत पोहचली. मात्र फोटोग्राफर्स आणि चाहत्यांची गर्दी गाडीपर्यंत आली.  दीपिका गाडीत बसत असताना टिश्यू विकणाऱ्या एका महिलेनं तिची पर्स खेचली. हा प्रकार दिसताच बॉडीगार्डने पुढे होऊन तिची पर्स महिलेच्या हातातून सोडवली. दीपिका या प्रकरणावर कोणत्याही प्रकारे लगेच रिअ‍ॅक्ट न करता गाडीत बसून निघून गेली.

Recommended

PeepingMoon Exclusive